🩷बायको🩷
चेहरा तिझा हा सुंदर खास त्यामध्ये आहे आपुलकीचा ध्यास जिव्हाळ्याची जपली कास म्हणुन सर्वाना तिझी आस गोड वाणी हळवी फार कठीणप्रसंगी मोठा आधार माणुसकीचा जपला ठेवा म्हणुन तिझा वाटतो हेवा संस्काराची भरली शिदोरी म्हणुन तिझा सुख पदरी नाही कधी अट्टहास प्रेमाने जपते सर्वांस रुसवा -फुगवा थोडाफार तरी आहे ती खुप समजूतदार शांत आणी संयमी फार कोणत्याच क्षेत्रात कधी मागे नाही हटणार अशा ह्या प्रेमळ बायकोचा वाटतो मला अभिमान अशा ह्या प्रेमळ बायकोचा वाटतो मला अभिमान /- किरण पडवळ
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
