ज्याचं दुखतं, त्यालाच कळतं…
प्रत्येक चेहऱ्यावरचं हसू खरं असतंच असं नाही, काही हसू फक्त वेदना लपवण्यासाठी असतं. लोक विचारतात, "कसं वाटतंय?" पण उत्तरामागचं दुःख समजून घेण्याची तसदी फार कमी जण घेतात. हॉस्पिटलच्या त्या बेडवर पडलेला माणूस औषधांपेक्षा आशेवर जगत असतो, आणि बाहेरचं जग दोन शब्द बोलून आपलं कर्तव्य संपल्यासारखं समजतं. गर्दी तर खूप असते अवतीभवती, पण त्या गर्दीतही तो माणूस स्वतःच्या वेदनांशी एकटाच लढत असतो. कारण काही लढाया अशा असतात, जिथे साथ देणारे अनेक असले तरी वेदना मात्र एकट्यालाच सहन कराव्या लागतात. जखम शरीरावर असो किंवा मनावर, तिची खोली फक्त ती सहन करणाऱ्यालाच माहीत असते. बाकीचे फक्त अंदाज बांधतात, पण वेदनेचा भार उचलू शकत नाहीत. म्हणूनच म्हणतात— ज्याचं दुखतं, त्यालाच कळतं. बाकीचे फक्त समजल्याचं नाटक करतात… कारण वेदना दिसत नाही, ती फक्त जगावी लागते. ✍️ अमित पवार
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
