पुन्हा एकदा.....❤️
शब्दांना आला बहर पुन्हा एकदा सजून तू केला कहर पुन्हा एकदा तुला साठवले मी डोळयात माझ्या पडले सारे नजारे धुसर पुन्हा एकदा धुंद व्हावे वाटते प्रेम नशेत तुझिया टेकव अधरावर अधर पुन्हा एकदा चांदण्यांच्या साक्षीने घे मिठीत मला चांदव्याचा पडू दे विसर पुन्हा एकदा जगणे जीर्ण झाले पांगल्या मैफिली दिसू दे जगण्यात असर पुन्हा एकदा ये जिवनात दे साथ साता जन्माची प्रेम हे अपुले कर अमर पुन्हा एकदा
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
