काळोख...
प्रकाश्याच्या भरवशावर, कधी कुणाला काळोख समजला आहे?? अन ज्यानें काळोखाला समजले, त्याला कुठे प्रकाश उमजला आहॆ?? प्रकाश सोडुन गेला म्हणुन काय, काळोख एकटा आहे?? की कळोखानेच संन्यास घेवून, प्रकाश त्यागला आहॆ?? पापण्यांची उघडझाप, फक्त्त इतकेच अंतर आहे... काळोखात प्रकाश, अनं प्रकाशातच काळोख आहॆ... पाप पूण्याच्या तराजूने, काबर आनंद मोजत आहे... बघ हा काळोख, किती प्रेमाने, प्रकाशाचे पाय चेपत आहॆ... इथे ना कोणताच प्रश्न, ना कोणतंच उत्तर आहे... राधेच्या पावन नयनातुन, अश्वथामाची जखम ओघळत आहॆ... राधेच्या पावन नयनातुन, अश्वथामाची जखम ओघळत आहॆ... डॉ. ललित नांदुरकर....
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
