माझी आई
अश्रू येता डोळ्यांमध्ये हसू माझी आई कोणी नसले माझे तरी ओळख माझी आई अंधारल्या जगात माझ्या पहाट माझी आई थकले डोळे माझे जरी स्वप्न माझी आई हरलो असेल कितीही वेळा तरी ध्येय दाखवते माझी आई आणि जर जिंकलो तर माणुसकी शिकवते माझी आई शब्द माझे झाले आणि नि:शब्द नाहीत अक्षर आईसाठी अर्पण माझे संपूर्ण आयुष्य अनमोल माझ्या आईसाठी ...... अनमोल माझ्या आईसाठी..........
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
