धनंजयी विश्वास मनी...
हे परमेश्वरा चालतो मी वाट नवी, इच्छा ही कष्टाला तुझी साथ हवी . न व्हावा पावलो पावली तुझा विसर , आशीर्वाद भरून काढ तू आयुष्यातील कसर परिस्थितीने जरी वाट माझी अडवली , विश्वास मज तू हात न सोडीत जणू सावली . विश्व जरी देई मज चटके उष्ण , राशील तू बनून माझ्या रथाचा सारथी कृष्ण जसा सारस राही काळया मेघाचा ऋणी , तसा तू येशी मदती हा धनंजयास विश्वास मनी. - पार्थ कारंडे
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
