शिल्पकार
म्हणतील लोक वेडा तर म्हणू दे रे तू का लक्ष देतो त्यांच्या बोलण्याकडे बोलतील बोलतील खूप काही ऐकला नाहीस तर सोडून देतीलही पण तुझ्या कानांना किती ऐकवायचे हे तुझं कौशल्य तुझं तुला जाणायचे तुझी कला तुझी आवड निवड बाकी सगळ निवळ व्यर्थ आहे जगाच्या पसाऱ्याकडे लक्ष देणे हे तुझ्याच हाती निराशेचे लेणे पुरून उर आता सगळयांना एवढंच राहतं पाहणाऱ्यांना बाकी तूच शिल्पकार तुझ्या आयुष्याचा ©DMAYURI
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
