हीरवळीच सत्य
हीरवळीच सत्य ======================= दुरुन दिसणारी हीरवळ आता, घनदाट आरन्याच सत्य उघड पाडु लागली, स्लीपरला फडुन काटा खसकन घुसुन, पायाची इजा मस्तकापर्यंत पाहुचु लागली. कोळसनीचा पाला घासुन, इजा थोडी कमी झाली तरीही, भीती मात्र आता......., खुपच वाटु लागली. पुढचा प्रवास सुखकर होण्यासाठी, परत हीरवळीचीच आशा, उन्हाळा, पानगळ झाल्यावर, परत झाड झुडप हिरवी. परत एक आशा मणाची , पळस भेटेलच कुठे तरी, तीन ऐवजी पाच पाणाचा. परमेश्वराचे मुख दर्शन नाही भेटले तरी, आता त्या पळस पालवीचीच आशा, भेटेलच पंचमुखी ती अलौकीक शक्ती, नक्कीच ......, परत त्या हीरवळीचीच आशा, परत त्या हिरवळीचीच आशा. =========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
