वारीचा मुक्काम – एक थांबा
– शब्दवेडा संतोष राऊत आज इंदापूरच्या मातीत थांबली, तुका माऊलीची पालखी सांभाळली। ओल्या वाऱ्यांत मृदंगाची थरथर, आभाळही डोळे पुसू लागले भरभर। लोणंदच्या कुशीत विसावला ज्ञानोबा, प्रत्येक वाऱ्यात गुणगुणतो माउलीचा गा। पावलोपावली विठू माऊली सामोरी, दिंडीत चालतो भक्तीचा सागर पायात ओढ घेई भारी। हा मुक्काम नुसता थांबा नाही रे, तो प्राणांचा धागा विठूनामात गुंफलेला। थकलेली पावलंही जणू भारावून जातात, जेव्हा हरिपाठाच्या ओवीत जीव हरवतो क्षणात। आईसारखा हा मुक्काम वाटे, जणू भक्तांना स्वतः विठोबा गोंजारते। भिजलेली साडी, ओले कपाळ, तरीही ओठांवर विठूच्या नामाचा गंधाल। कधी झोपडी, कधी मंदिर, कधी रस्ता, माउलीचं घर वाटे, तिथं असेल जिथं प्रेमास्ता। वारकऱ्यांच्या नजरेत भाव विठोबाचा, त्या एका मुक्कामातही दिसे मुक्काम त्याच्या चरणांचा।
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
