स्त्री आहे ती....
स्त्री आहे ती म्हणून प्रश्न तुम्ही विचारायचे, आता मात्र स्त्रियांनी समाजाप्रमाणे वागायचे ? का हवेत मुलींला कला आणि गुण, सांभाळावे लागणार शेवटी चूल आणि मुल. मुलींचं नेहमी चार भिंतीत गुंतणं, समाजाने तर बंद केलय मुलींचं उडणं. दिसला कोणी अनोळखी तर नजर ठेव खाली, पण लग्नानंतर अनोळखी सोबतच हाकायची आहे संसाराची गाडी. जन्म मिळाला स्त्रीचा म्हणून स्वतःचे स्वप्न मागे सारायचे, तरी सुद्धा स्त्रीनेच का चारित्र्याचे स्पष्टीकरण द्यायचे ? स्त्री आहे ती म्हणून सोडवत असते पहेली, बनते मुलांची आई तर पतीची सहेली. स्त्री आहे ती म्हणून सर्व पात्र तिने साकारायचे, मुलगी, आई, बहीण, पत्नी बनून सर्वांना सामोरही तिनेच जायचे. कुमारी, विवाहित किंवा विधवा असो ती, शेवटी आहे नारी जात रुद्राईचा अवतार आहे ती. बदलला आहे काळ बदलली आहे संस्कृती, स्त्रीने दाखवून दिले जगाला ' स्त्री किसिसे कम नही.' - ऋतुजा बळीराम नांगरे -Rutuja Nangare
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
