तो आणि त्याची ती
तिला रात्रीच्या अंधारात टिमटिमनाऱ्या ताऱ्यांचा प्रकाश हवा असतो... त्याला सकाळच्या सोनेरी किरणांचा तेज हवा असतो... तिला बोलायला शब्द हवे असतात त्याला तिचे ऐकायला शांतता हवी असते... तिला मैफिलीत शामिल व्हायला हवे असते त्याला त्या मैफिलित तिच्यासोबतचा एकांत हवा असतो... तिला फिरायला हवे असते त्याला फिरताना त्याच्या शेजारी ती हवी असते... तिला लोकांची मन जपायला आवडत असते त्याला लोकांपासून तिचे मन जपायला आवडत असते.. तिला त्याला समजून द्यायला आवडत असते त्याला तिचे समजून घ्यायला आवडत असते... चहा दोघांनाही आवडतो पण... तिला निवांतपणे हवा असतो त्याला गडबडीतील एक निवांत क्षण म्हणून हवा असतो... आवड वेगळी असली तरीही तिला तो हवा असतो आणि त्याला ती हवी असते...
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
