"मी खर बोलतो....ते जळत"
"मी खरं बोलतो… ते जळतं!" – शब्दवेडा संतोष रामकिशन राऊत खरं बोलतो… म्हणून लोकं चिडतात, माझ्या शब्दांत साखर नाही, म्हणून घाबरतात. मी मिठासारखा झणझणीत आहे, गोडगोड खोटेपणाच्या दुकानात माझं मूल्यच नाही! तोंडावर खोटं हसणं मला मुळीच जमत नाही, मनात विष ठेवून नाती टिकवणं मला आवडत नाही. कोणी दुखावलं, तर स्पष्ट बोलतो, पण समोरच्याची झुट्टी लावणं हे माझं काम नाही! शब्द माझे तलवारीसारखे – धारदार, पण मन माझं निर्मळ – पाण्यासारखं पारदर्शक. मी खोटेपणात मिसळत नाही, खरं बोलतो, जळलं तर मला त्याचा पश्चात्ताप नाही! माझ्या माणसांना मी आरसा दाखवतो, त्यात त्यांचं खरं प्रतिबिंब दिसतं – म्हणून ते मला सोडून जातात. पण मी आजही उभा आहे, कारण खोट्यांच्या गर्दीत, खरं असणं हीच बंडखोरी आहे! शेवटचा वार — "ज्यांना माझं खरं नको वाटतं, त्यांनी माझ्या नावानं शिव्या देऊ नयेत… कारण मी गोड बोलणारा एक बनाव नाही – मी 'शब्दवेडा' आहे – जळतो, पण खरा राहतो!"
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
