झाडं लावा, पर्यावरण वाचवा!
गमतीत केल्या साऱ्या गोष्टी, विचार केला नाही, निसर्गाशी खेळताना, संकट आणलं लवकरच ठायी. पाण्याचा वापर झाला, ना पुढचं कधी पाहिलं, निसर्ग रागावला, आणि संकट आपल्यावर वाहिलं. पाणी वाया गेलं, ना केली काटकसर थोडी, आज विकत पाणी घेतो, झाली अकारण धडाडी. जर तेव्हा शहाणपण दाखवलं असतं, थोडं बचत केलं असतं, तर आज पाणी विकत घ्यायला, कधीही न लागलं असतं. हवा कधी मिळे फुकटात, आज विकतो तिचा भाव, ऑक्सिजनसाठी माणूस झगडतो, होतो खर्चाचा ताव. झाडं जर वेळेवर लावली, जपलं असतं जर रान, तर निसर्ग दिला असता मोफत, प्राणवायू अन् जीवनदान. झाडं लावा, झाडं जगवा, हीच आहे खरी शिकवण, प्रकृतीला जपून जगू, हेच अनमोल जीवनाचे धन झाडांमध्ये आहे जीवन, आणि त्यात हरित शक्तीचा वास, जेव्हा झाडं जगवू,तेव्हा होईल पृथ्वी परिपूर्ण आणि खास.
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
