शोध आत्म्याचा...!
बुडबुडा तो हवेचा, फुटताच पसार झाला शोधू कुठे त्याला? जसा रंगात रंग मिसळला. जाणिव होते जरी, वाटे अवती भोवती शोधू कुठे त्याला? जशी हवेत हवा मिसळती. वाटे असेल प्रवासी, येईल कधी तरी शोधू कुठे त्याला? या गर्दीच्या सागरी. पाहतो चरा-चरी, प्रतिमा दिसेल कुठेतरी शोधू कुठे त्याला? या जगाच्या पाठीवरी. बंद या नयनी, मन माझे मज विचारी शोध घेई जीवा, पण आत्मा तो अंतरी. श्री. व. शि. राठोड
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
