शिक्षक म्हणजे काय...
शिक्षक म्हणजे विशाल वृक्षचं असतो ज्याच्या फांदी-फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे ज्ञानाची पाने.... त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते अज्ञानाच्या उन्हात न्हाऊन निघालेल्या अस्फूट चित्रकाराला किंवा त्याच्याच रेषेखाली अधांतरी लटकलेली असतात कित्येक भावनांच्या डोहात भिजून नतमस्तक झालेली इवलाल्या चेहर्याची निरागस अक्षरे ..... शिक्षक नसतो कधीच बिचारा तोच तर असतो बादशहा शाळेचा त्याच्याच स्वामित्वाने महत्त्व येत असते शाळेला तोच तर असतो खरा संशोधक, शास्त्रज्ञ..... अंधार भरलेल्या चिमुकल्या गोळ्यातून सूर्याच तेज बाहेर काढणारा तो समाजसुधारक, क्रांतिकारक ही तोच कित्येक चेतनांना पाठबळ असते त्याच्या समर्थ तत्त्वज्ञानाचे...... शिक्षकाला जपावी लागतात कुतुहलाच्या झाडाची पानं जिवापाड आणि आकार द्यावा लागतो एका मुक्तपणे बागडणार्या निराकार चैतन्याला..... कधी स्वतः ला विसरून बागडावं ही लागतं जाणून घ्यावे लागतात बोल खोल खोल काळजाच्या आत निर्गमपणे कधी अंधार ही प्यावा लागतो बेभानपणे तेव्हा कुठे चमकतात उजेडाची किरणं उद्दिष्टांच्या वाटेवर त्याच्या सोबतीला असतेच की खडूची धारदार तलवार अन् फळ्या ची ढाल असते पाठीशी
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
