तू माझा विश्वास नवा होता....
कोलमडलेल्या आयुष्यात एक आधार हवासा होता उलगडता मी तुला तू माझा विश्वास नवा होता....... हरले रडले तरी तू धीर मला देत होता वाटेवरच्या काट्यांमध्ये तू जगायला शिकवत होतास मी मला कळताच क्षणी तू नव्याने बहरत होतास अवघड शा आयुष्या मधला तू मार्ग माझा होता जरा उशिरा कळले मला तू माझा विश्वास नवा होता..... सोसणाऱ्या घावांमध्ये तू बळ देत होतास मी मला सावरताना तू माझा ध्यास बनत होतास हरले आयुष्यात खूप वेळा तिथे तू ढाल माझी होता हळूहळू उमगले मला तू माझा विश्वास नवा होता........
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
