ती स्त्री ......✍🏻आनंदी जाधव
कधी होती मुलगी अबोल निरागस, आकाशासारखी स्वच्छ, निर्मळ स्पर्श. आजच्या जगातच बदलली परिस्थिति, भयाच्या सावल्या घेती प्रत्येक निती. लहान असो वा मोठी, भय सारखंच त्यांना, रस्त्यांत, बाजारांत, विळखा आहे जाणा. स्वातंत्र्य मिळालं म्हणे आधुनिक युगात, पण सुरक्षितता हरवली पूर्वी धर्मराज्य, न्यायाचा धर्म, दोषींना शिक्षा होती कठोर, अखंड. राजांची सत्ता, होती कठोर आणि खरी, स्त्रीचा मान राखणारी समाजाची तरी. परंतु आजच्या काळात ढोंगी मुखवटे, कायदे आहेत, पण अपराधी किती पवित्रे ? मनुष्यच बदलला, विचार झाले विकृत, स्त्रीच्या सन्मानात पडले धूसर चित्र. जग बदलावे, पण मूल्ये नको हरावीत, स्त्री ही शक्ति आहे, तिला सन्मान मिळावीत. न्याय पुन्हा जागो, हृदयांत प्रखर ज्वाला, स्त्रीला सुरक्षित ठेवणे हीच खरी जबाबदारी निवाला......
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
