येईल का तो दिवस
कधी येईल का तो दिवस पण तू मला स्वतः मिठी मारशील तू जात असतानी मी जात असतानी मागे वळून मला हाक मारशील कधी येईल का तो दिवस पण तुझा हात माझ्या हातात देशील एक दिवस साठी नाही दिवसेंदिवस साठी नात आपल जपशील कधी येईल का तो दिवस पण माझ नाव तू सर्वांसमोर घेशील विसरूनी तुझ्या आवडी निवडी आवड फक्त माझी ठेवशील कधी येईल का तो दिवस पण तू फक्त माझा विचार करशील राहिलेल्या आठवणी ला फुला सारख सोबत तुझ्या वागवशील कधी येईल का तो दिवस पण माझ्या प्रयत्नांना तू खर समजशील माझ्या प्रत्येक अश्रूंना तु मायेने पुसून काढशील कधी येईल का तो दिवस पण तू तुझ्या चुकीच्या माफीत फक्त आणि फक्त मला मागशील कधी येईल का तो दिवस पण माझा श्वास थांबायच्या पाहिले एक वेळेस माझ्या सोबत जगशील
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
