हुंदका,
असे कित्येक हुंदके, तिच्या डोळ्यांवाटे वाहिले. कधी ओले कधी सुके, मी वाहतांना पाहिले. संसाराचा भार, उभं वरीस उराशी तीन मुलं दारी, धनी होता पाठीशी रान तुडवीत सार, सार्या भेगा पायालं जणू चैताची धूप, जसं रान फाटलेलं केले रान हिरवेगार, धन्यासोबती राहून. मुला भरविला खास, पोट उपाशी मारून. कसं नशीब फुटकं, वाणी सदा तिच्या ओठी. तरी नाही सोडला धीर, धन्या मुलांच्यासाठी जाई प्रत्येक हुंदका, शीण दिसाचा तो घेऊन. आसू पुसी पदरानं, जणू लेकरू होऊन. आसू पुसी पदरानं, जणू लेकरू होऊन.!! - ज्ञानदेव विमल लखुळ वाहुळे मोबाईल: 7038206753 21/09/2024
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
