आई....
न बोलता समजते दुःख सारे माझे आवाजानेच आळखते गुफीत कोडे सारे.. गुन्हा कितीही करो पदरात तीच घेते माझ बाळ म्हणून शेवटी प्रेमाचा घास तीच भरवते.... लहान असो वा मोठे बाळ म्हणनारी तीच असते ममतेची माया लावणारी तिच्याविना कोणी नसते.. आईचा रंग इंद्रधनूचा, आईचा गंध मायभूमीचा, आईचा स्पर्श हा मायेचा, आईचा मान हा देवाचा..... निस्वार्थ प्रेम करणारी मायमाऊली ती आहे तिच्याविना देव सुद्धा भिकारी आहे.......
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
