आई
तुझी साडी गं आई.. तुझ्या वाचुन कुणावरच शोभत नाही. तुझ्या हातचा तो मुठ्याचा,खारवड्यांचा घास जीवाला आजही लागतो गं त्याचा आस. सर्दीत दिलेली तू दिलेली मला ती वाफ चुक झाली की तुझ्यासारखे कुणी नाही करत माफ. वाघिणी सारखी तू तुला कुणाची नव्हती भिती, पण तुझ्या पिलाला अजुनही नाही कळत जगाच्या रिती... खुप सोसला गं आई तु भार... तरी नाही मानलीस कधीच तू हार. तुझी जागा चालविणे. .नाही आहे सोपे काम दर दुसरया दिवशी तुझ्या आठवणीत होतो मी रममाण.. तुझी सावली बनुन ठेवल्या गं आठवणी आई..! आजारी असलो की तुझी आठवण आल्या विणा राहवत नाही गं आई...! तुझ्या आठवणी विणा राहवत नाही. आई..! बोलाव ना गं आई... मला इथे मात्र करमत नाही.
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
