रावण.....
रावणाने सोन्याची लंका उभी केली, शौर्य होतं, बुद्धी होती – तरी मस्ती कधी नाही केली. ना स्टेटस टाकलं, ना लाईक्स मागितल्या, सामर्थ्य गाजवलं पण प्रसिद्धीची तहान नाही बाळगली त्याने. आज मात्र... वांग्याची भाजी केली, तर फोटो लावतात, "हाताचा स्वाद" म्हणत स्टोरीवर रंग चढवतात. कपड्यांचं ब्रँडिंग, जेवणाचं शूट, साधं जगणंही झालंय डिजिटल लुकात कूल. सांगायचं इतकंच – त्या राक्षसातही होती काही मर्यादा, आज माणूस 'रिल' मध्ये, पण खरा हरवला सारा. तो सोन्याचा राजा होता, पण गर्वाचा नव्हता, आणि आपण? कांद्याचं भजे केलं तरी फोटोचा हट्ट असतो! शब्दवेडा संतोष रामकिशन राऊत.. 9657937879
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
