अहंकार....
अहंकार....... कधी सूर्योदया सारखं उगवावं कधी धगधगत्या ज्वालेत भस्म व्हावं.. भास माणसा जगण्याचा हा केवळ देह संपवावा अहंकाराचा .. खेळ रे हा फक्त तुझ्या नि माझ्या अस्तित्वाचा.... संगत सोबत जर झाली महान कर्तव्याशी स्वतःला त्रास उगीच कशाला यश अपयश प्राण प्रतिष्ठा सगळे चोचले निर्जीव अंगाचे जाळूनी खाक कर रान स्वार्थाचे उरावे फक्त विचार जणू अभंग तुकोबाचे... मी श्रेष्ठ तू श्रेष्ठ कोण कनिष्ठ हे विश्व कधीच अडकले भेदभेदात प्रश्न उत्तराच्या या अंतिम खेळात उत्तर मात्र तुझं ही मातीत नी माझं ही मातीतच एकाचा जीव गेला उंभरट्यावर दुसरा तुडवीत त्याला, बसला सिहांसनावर . . एकाच्या डोळ्यात स्वप्न अस्तित्वाचे दुसऱ्याचा हातात शस्त्र विनाशाचे... कहाणी हीच प्रत्येकाची... थोडी अस्तित्वाची थोडी अहंकाराची..... कवी:- उमेश नारायण गायकवाड
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
