मी ओळखले मला....
मी ओळखले मला पहाटेच्या वाऱ्यामधून अश्रूंच्या धारांमधून वेदनेच्या पहाडांमधून थकले होते जराशी पण विश्वास होता मनाशी तुटले होते भ्रम जरी तरी लढेन त्या तेवणाऱ्या निखाऱ्याशी तावून सुलाखून मी चमकेन हिऱ्यासारखी ही जिद्द नाही माझी हे वास्तव साकार करेन मी चटके सोसून स्वतःस स्वतःच घडवेन मी उमगले रानफुलां मधून मी सापडले आत्मविश्वासामधून मी ओळखले मला मार चटक्यांच्या वेदनांमधून विश्वास तुटून पडलेल्या मनाच्या हृदया मधून सोसलेल्या घावांमधून तरीही घट्ट उभे राहून चालणाऱ्या माझ्याच पायांमधून मी ओळखले मला.........
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
