नामरंग
सदगुरूंनी दिलं नाम, जणू सहस्र दीप हाती, अंधारलेल्या वाटेला मिळाली सुवर्ण प्रभाती. पंच शब्द — पण त्यात सार विश्व दडलं, उच्चारता उच्चारता अंतरंग नव्याने फुललं. हा रंग कापडाचा नव्हे, की पाण्याने जाई, हा रंग आत्म्याचा — जन्मोजन्मी ची शाई. डोळ्यांत करुणा, वाणीमध्ये माधुर्य, चालण्यात उमटलं एक वेगळंच सौंदर्य. कृपेचा तो स्पर्श जसा वाऱ्याची लय, नाम घेताच अंतरी निवळली सगळी भय. आता नको वेगळं सुख, नको दुसरं स्थान, नामच झालं माझं जग, नामच माझं ध्यान. जग रंगीत दिसे त्या एका रंगामुळे, अंतरंग उजळे त्या एका स्मरणामुळे. सदगुरूंनी दिलेलं हे अमोल दान, नामरंगात हरपलं माझं संपूर्ण भान.
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
