कसं असतं खरं प्रेम?
कधी कोमल भावनांनी दरवडलेलं तर कधी काटेरी अस्तित्वात सामावलेलं... हे गुलाबासारखे ,प्रेम असतं कधी तुझं माझं असं काही नसतं तर नेहमी आपलं मानून पुढे जाणं... हे प्रेम असतं... कधी हातात हात धरून चालणं तर कधी सोबत नसतानाही एकमेकांना सावरणं.. हे प्रेम असतं कधी सुखात तिच्या गालावरची खळी होणं तर कधी दुखात त्याच्या अश्रूला खांदा देणं हे प्रेम असतं... कधी आपसातली परिस्थिती समजून घेणं तर कधी सोबतीचा अबोल संवाद ऐकणं हे प्रेम असतं कधी कडाक्याचं भांडण होणं तर कधी गुळाचा गोडवा असणं हे प्रेम असतं कधी त्याची एक व्याख्या नाही तर कधी त्या नात्याला एकच नाव नसतं ते प्रेम असतं तुमचं आमचं सगळ्यांचं ते खरं असतं...
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
