पोहोचायचे आहे क्षितिजापाशी...
जन्म घेतला कशासाठी प्रश्न विचारा कधीतरी धीर सोडून चालेल कसे तुला पोहोचायचे आहे क्षितिजापाशी........ येतील हजार वादळे तुला थांबवण्यासाठी रडवण्यासाठी आणि हरवण्यासाठी पाय रोवून जमिनीत उभे रहा ठामपणे झालर लावून कष्टाची चालत रहा ध्येयाकडे धीर सोडून चालेल कसे तुला पोहोचायचे आहे क्षितिजापाशी ...... मार चटके वेदना शिकवतील आयुष्य जगणे प्रयत्नाचे लावून सार तू झुंजत रहा स्वतःशी कितीही टोचले काटे जरी तरी चालत रहा फक्त स्वप्नासाठी बदलून जाईल सारे काही जेव्हा पोहोचशील तू क्षितिजापाशी....
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
