दडलेला चंद्र...
चंद्र आज दडलाय काळोखाच्या गर्दतेत पारा आज चढलाय रात्रीच्याच जाणीवेत शोधूनही सापडेना आवाजही पोहोचेना अंधारात तडफड हाती धागा गवसेना प्रश्न प्रश्न मनामध्ये कसे कोठे शोधू आता द्वार झाले बंद आता चावी ही न लागे हाता घुटमळ जीवातली बंद काही होईनाच आवाजाच्या सादेलाही प्रतिसाद मिळेनाच काय काय करू आता प्रश्न हाही धरी खंत मनातील ओढ आता धरी पायी द्वंद्व आता पाहण्याची तळमळ निद्रेतही जाणवते स्वप्नातही हर क्षणी भास श्वास थांबवते कळेनाच काय झाले अस्थिरल्या मनास या तरी सुद्धा रोज रोज हवा फोटो पाहावया चंद्र मनी साठवाया साज मनी चढवाया शितलता लेवूनच स्थैर्य मनी उतराया ©®प्रारवाद्या
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
