कधीकधी
मी एकटाच माझा असतो प्रवास कधीकधी फुलात चांदण्याचा नसतो सुवास कधीकधी एकही अश्रू कोणाच्या डोळ्यात ना पाहिला होतात सरणांच्या वेदना तो आभास कधीकधी कळतात मजला इषारे नवे तुझे बहाणे डोळ्यात सप्तरंगाची भासते आरास कधीकधी थोडे जरी नभाने या जीवास दान द्यावे मातीतून चैतन्याचा गातो ध्यास कधीकधी या पापणीला असावा सुगंध आसवांचा जपतो मनात माझ्या एकटा श्वास कधीकधी
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
