हृदयात माझ्या ...
हृदयात माझ्या कोरले चार शब्द छेडल्या मनानं तारा , प्रेमाचे सप्तरंग धुन तुझ्या गीताची ह्दयास ऐकवीत उरल्या फक्त भावना शब्द झाले लुप्त। असा का मी बेधुंद वार्यासारखा वाहतोय, आठवणींना स्पर्श करुन चालता पाय काढतोय.. सलतंय अजुन तरी काय? वेदनाच होत्या ना त्या!? घाव आठवला की काळीज चरचरतंय। ऐकलेच असते तेंव्हा काय बदललं असतं सारं? जीवापरी जपलेलं तुटलं नसतं नातं.. प्रेमात जीव जपला सोडावी लागली साथ तुझी. ऐकणार तर मी कसा, तुझ्या जीवाचा सवाल होता.. नियतीने दुर केले तुला-मला हा इशारा सावजतेचा, जीव कि प्रेम काय निवडायचं? शपथा त्या आठवताच सगळं झालं नीरव... तिला विसरण्याचे व्यसन असे कसे लागले सवय अाणि आठवणी का सळु लागले.. सांजवेळी येते आठवण तुझी , रात्रीस चांदण्या पाहतास येते आठवण तुझी, हे नित्याचे झाले.. तुझा विरह असा का छळतो आहे.. तुझ्याशिवाय जगण्यात मी हारतो आहे.. हृदयात माझ्या कोरले चार शब्द छेडल्या मनानं तारा,प्रेमाचे सप्तरंग...। ------Prathameshka
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
