नजरेची खोली.....
तुझ्या नजरेच्या खोलीत आकाश भेटतय स्पर्श रंगांत भिजवून कुशीत ओढतय मुक्त करून स्वतः तील कुलूपबंद वेदना नजरेस साद देवून करी मुक्त भावना तुझ्या नजरेच्या दृष्टीत मन मुक्त फिरत विसरून बंध सारेच नवेक्षण शोषत नव्या रूपास खुणावून तुझ्यामध्ये गुंतत तुझ्या विशाल सावलीत एकजीवे रूजत न कळे कसे हे घडते मन एक भासते तुझ्या जीवास स्वतः चेच प्राण जोडू पाहते तुझ्या नजरेच्या खोलीत आकाश भेटतय जिथ आसपासच जग फिकच वाटतय ©®प्रारवाद्या
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
