मी पुन्हा शाळेत आलो...
लेखन : शब्दवेडा संतोष रामकिशन राऊत आज तब्बल तेरा दिवसांनी मी पुन्हा शाळेत आलो. शाळेचा उंबरठा ओलांडतानाच जाणवलं, काहीतरी हरवलं होतं या दिवसांत... काहीतरी माझं, अगदी हक्काचं! वर्गात पाऊल टाकताच सळसळत्या उत्साहात माझे लाडके विद्यार्थी धावत आले, डोळ्यांत चमक, पण ओठांवर काळजी... "सर, तुम्ही इतके दिवस का नाही आलात?" "काय झालं होतं? आजारी होता का?" "हॉस्पिटलमध्ये होता का सर?" त्या प्रत्येक प्रश्नामागे लपलेली त्यांच्या मनाची धडधड जाणवत होती. क्षणभर माझा श्वास अडखळला... शब्द सुचेना... मन थोडं गहिवरलं... आणि मग हळूच म्हणालो — "हो बाळांनो, तब्येत थोडी बरी नव्हती गं… म्हणून येता आलं नाही!" पण त्या निरागस नजरा मात्र अजूनही मला तपासत होत्या... जणू विचारत होत्या — "आम्हाला एकटं करून गेलात का हो सर?" मला एक गोष्ट नव्यानं उमगली विद्यार्थी हे केवळ शिकणारे नसतात, ते तुमचं आयुष्य असतात. तुमची अनुपस्थिती त्यांच्या जगात रिकामी जागा निर्माण करते. आणि शिक्षक म्हणून मिळालेलं हे नातं, हे प्रेम, हा विश्वास… हाच खरा पुरस्कार असतो. इतके दिवस मी आजारी होतो, पण खरं सांगू? या मुलांनी विचारलेल्या प्रश्नांनीच मला पुन्हा बरा केलं. त्यांच्या प्रेमानेच मला उठून उभं केलं... आज पुन्हा शाळेत आलो, पण आज ‘मी’ नव्यानं सापडलो — विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत, त्यांच्या काळजीत, आणि त्यांच्या अगदी सहज पण प्रेमळ बोलण्यात... शाळा म्हणजे वर्ग नाही, ती एक भावनांच
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
