माझे आभाळ भरून यावे....
हळव्या क्षणांनी माझे आभाळ भरून यावे थेंबा थेंबा मधून थोडे अलवार से बहरावे आठवणींच्या नदी मधून ओसंडून वाहावे धबधब्यांच्या आरशा मधून सुंदर ते दिसावे वळणा वळणा मधून गाणे गात जावे. हिरवळीच्या कुशीमध्ये थोडे विसावून पहावे थेंबा थेंबा मधून अलवार से बहरावे माझे आभाळ भरून यावे. डोंगरामधून झऱ्याकडे झऱ्या मधून नदीकडे नदी मधून समुद्रात मिसळूनी जावे. पुन्हा परत थेंबा मधून नवा जन्म घ्यावे असे हे आभाळ माझे पुन्हा पुन्हा भरून यावे आयुष्याच्या पावसामध्ये सारे काही भिजून जावे. थेंबा थेंबा मधून अलवार से बहरावे माझे आभाळ भरून यावे.....
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
