आम्ही उपग्रह आणि आमचे ग्रह
कॉलेज मध्ये शिकायला जातात ही आमचीच नाही तर सर्वांचीच अंधश्रध्दा होती गुण, डिग्री, पुस्तक यावर नाही तर आमची फक्त आमच्या ग्रहावर श्रद्धा होती पृथ्वीभोवती जसा चंद्र फिरतो तसेच आम्ही ग्रह आमच्या पृथ्वी भोवती फिरत होतो गुरुत्वाक्षणाचे सर्व बिंदू जोडून त्याला आकर्षित करण्याचे प्रयत्न करत होतो आपले ग्रह काय करतात त्यांची दशा काय आहे याकडेच उपग्रहांचे ध्यान होते आपल्या ग्रहाच्या शनीची चिंता करून घिरट्या घालत राहणे येवढेच काम होते आपले उपग्रह कोण आहे याची ग्रहाला सुद्धा पूर्ण जाणीव असायची आपला उपग्रह आपल्याच कक्षेत रहावा यासाठी गृत्वकर्षण शक्ती वाढवण्याची त्यांची पूर्ण प्लॅनिंग असायची अंतराळातील हा खेळ शेवटी अमावस्येच्या काळोखात हरवून गेला आपल्याच ग्रहाच्या विवाहात हा उपग्रह भाजी म्हणून आपल्या भावनांचा वांग वाढत राहिला. तो जुना ग्रह अजूनही कधीतरी दिसतो आपल्या उपग्रहला परत एकदा आकर्षित करतो परंतु ग्रहा सोबतचे दोन लघुग्रह आणि एक धूमकेतू दिसला की हा बिचारा उपग्रह आपल्या आकाश गंगे सोबत अंतराळात नाहीसा होतो
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
