घरटे एक आठवण
जवा माणसात माणूस भरकटते तवा आठवतात ते मायेचे हात जिथं भोळी भाबडी मानस जीवा लागते तेव्हां घराची ओढ बागडते निरागस ते बालपण आठवते थोडे किस्से जुने चारा दाण्यासाठी उडाले सारे पक्षी काळ लोटला आता ते घरटे सुटले जवा येती खाच खळगे जीवनात एका क्षणात तवा या भकास मनात खेचते सदा माझ्या घराची ओढ आता बनले ते घरटे एक आठवण
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
