मुक्ताई बीज
अंधा-या मातीखाली लपलेल्या स्वप्नांच मी बीज, अंकुरला कोंब, गगनाला भिडण्या लखलखीत वीज... नवचैतन्याचे रुजणे, प्रकाशाची लाभली साथ नवी दिक्षा उमेदाची, त्याला रिमझिमत्या पावसाची वाट... सुरूवात फुलण्याची अन् बहरण्याची, जरा उन्हाची झळ सोसण्याची, फोडून खडक, पेलून वादळ आसमंत गाठण्याची... इवलेसे बीज पेरले मुक्ताईने ओलावा तिच्या सावलीचा विठाईच्या रूपाने... ©️शिवम
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
