माय रडताना पाहिली
माय रडताना पाहिली* कविता माझी जगताना पहिली मी वाचताना माय रडताना पाहिली मी अश्रू तिचे ओघळत होते गालावरती त्या अश्रूंची घागर भरताना पहिली मी शब्द मनातले सारे माय बोलते माझाशी त्या बोलण्यात माय हसताना पाहिली मी सारे आकास ठेंगणे वाटले मला प्रेम ममतेची माया आज वाहिली मी जवळ घेऊनी हात मायेने फिरवी आनंदात आनंदी अश्रू आज वाहिली मी कवी पवन आठवले 05/03/2020
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
