अंधारातून प्रकाशाकडे नेणारा...
अंधारातून प्रकाशाकडे नेणारा, भ्रमातून सत्याकडे चालवणारा, संशयात अडकलेल्या मनाला शांततेचा स्पर्श देणारा… तोच खरा गुरु असतो. गुरु म्हणजे फक्त शिकवणारा नव्हे, तो आपल्या अंतरात्म्याला जागवणारा एक प्रकाशस्तंभ असतो. कधी कठोर शब्दांतून, कधी मायेच्या स्पर्शातून… तो आपल्याला घडवत राहतो – एक चूक न करता, निःस्वार्थ, नि:शब्द, पण सतत आपल्या पाठीशी. आई-वडीलांच्या कुशीतला पहिला पाठ, शिक्षकांच्या डोळ्यातली शिस्त, मित्रांच्या अनुभवातून मिळालेलं जीवनभान… आणि स्वतःच्या चुकांमधून शिकलेली शिकवण – हे सारेच गुरु… हे सारेच ‘माउली’! वयाने मोठा असो वा लहान, ज्ञान देणारा प्रत्येकजण ‘गुरु’ असतो. कारण ज्ञानाचं मोजमाप वयानं ठरत नाही, तर त्याच्या परिणामानं ठरतं. आज गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी, मनापासून एकच प्रार्थना – हे गुरुदेव, तुमचं मार्गदर्शन असंच कायम आमच्या विचारांत, कृतीत आणि जीवनात नांदू दे… सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या प्रेमपूर्वक, कृतज्ञतापूर्ण आणि हृदयस्पर्शी शुभेच्छा! — शब्दवेडा संतोष रामकिशन राऊत"
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
