मी शब्दवेडा – मुखवटे नाकारलेला
मी शब्दवेडा – मुखवटे नाकारलेला मी बोलतो सरळ – म्हणून राग येतो, पण माझ्या शब्दांमध्ये खोटं काहीच नसतं; तोंडावर सांगतो – जे मनात आहे, कारण मी मुखवटा घालून जगणाऱ्यांत नाही! तोडणाऱ्यांसाठी वेळ नाही माझ्याकडे, माझं वेळ फक्त जोडणाऱ्यांसाठी आहे; माझं नातं स्वार्थावर चालत नाही, ते मनाच्या मातीवर रुजतं, फुलतं, जगतं! मी नाही वाकतो कुणाच्याही ताकदीपुढं, कारण मी स्वतःच एक वज्रासारखा शब्द आहे; मी कवितेत नाही लपतो, मी कविताच बनतो – जसा आहे तसाच, खराखुरा! नातं तोडून गेलेले लोक विसरून जातात, पण मी त्यांच्यासाठी एक ओळ लिहून मिटवतो; आणि जे मनापासून सोबत देतात, त्यांच्यासाठी कवितेत जागा राखून ठेवतो. मी शांत वाटतो, पण जळतो आतून, शब्दांच्या आगीत स्वतःला पुन्हा निर्माण करतो; मी कवितेसाठी जन्मलो नाही... मी शब्दवेडा आहे – आणि शब्द माझं अस्त्र आहे! – शब्दवेडा संतोष रामकिशन राऊत
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
