मित्रा, घराची ओढ"
मित्रा विचारतोस, काम कसं चाललं आहे? मी म्हणतो, सगळं ठीक आहे… पण मन कुठे तरी अडकलं आहे. कामाच्या गर्दीत दिवस निघून जातो, हसत-खेळत वेळही सरतो… पण रात्री मात्र शांततेत, गावाची आठवण मनाला धरते घट्ट. घरी जाण्यासाठी परवानगी कोणाकडून घ्यावी? मनाची की परिस्थितीची? हातात काम, डोळ्यात स्वप्न, पण पाय मात्र गावाकडे धाव घ्यावी म्हणतात. आईचा आवाज कानात घुमतो, घरचं अंगण डोळ्यासमोर येतं… मी इथे असलो तरी, मन मात्र गावचे पाहुणे बनून फिरतं. समजत नाही स्वतःलाच कधी, मी कुठे आहे — शहरात की गावात? शरीर कामावर असतं, पण मन कायम घराकडे धावतं.
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
