पासवर्ड आयडी
पासवर्ड आयडी =================== मोबाईल कॅंपुटरचे लाॅक, ते ऑनलाईनचे सर्वच व्यव्हार, खुलत नाहीत की बोलत नाहीत, पासवर्ड आयडी विणा. आज दारावरची थपथपी, नाही की बेल ,वझर नाही, पाहुणे मंडळी सोडा खुद, मालकाला ही पासवर्ड आयडी शिवाय, घरात ईंन्ट्री नाही. जमाना आहे हा नंबर चा, इथे नाव नाही, साहेब तुमचा नंबर चालतो, नंबर आयडी नसेल तर, ईथे तुम्हाला किंमत नाही. काय वेळ आली माणसावर, ईथे जीवंतपणी कायदा, जीवंपणाचे सर्टफिकीट मागतो, आणी मेल्यावरही मृतचे, प्रमाण मागतो. ईथे माणुस माणसला नाही ओळखत, पण नंबरच तुमचे सर्व , भुत, भविष्या, वर्तमान ठरवितो, भुत भविष्य वर्तमान ठरवितो. ===================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
