पेटू दे होळी...
पेटू दे होळी होऊ दे राख वैराग्याची अपमानाची जळू दे ज्वाला मनातली नैराश्य मावळू दे, आळस करपू दे धुलवडीच्या राखेत रंग नवा जन्मू दे... तुटलेल्या नात्याची वीण पुन्हा विणू दे काळजातल्या जखमेला स्पर्श नवा होऊ दे विश्वासाची गुंफण इंद्रधनुत लहरू दे आपलेपणाची तिच उब मना मनात फुलू दे... आपणास होळीच्या मन: पुर्वक हार्दिक शुभेच्छा... -©® निरागसं...(गणेश पांढरे)
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
