इतकं सोप्पं असतं का!?
ज्या फुलाला पाण्याविना समजत नाही त्याच फुलाकडून वाळवंटात जगण्याची अपेक्षा करणं ... इतकं सोप्पं असतं का !? ज्या आकाशात उडण्याचे ध्येय गाठले कर्तव्याच्या खालोखाली आता त्याच आकाशाला लांबून पाहणं... इतकं सोप्पं असतं का !? ज्या घरपण साठी कधी घर सोडले नाही त्याच घरच्यांसाठी आता लांब जाऊन राहणं... इतकं सोप्प असतं का !? ज्या वाटेवर सोबती संग दूरपर्यंत चालायचे स्वप्न विणले त्याच वाटेवर आता एकटं चालणं ... इतकं सोप्प असतं का !? रात्रीच्या अंधारात जे डोळे अश्रुत भिजले सकाळ होताच त्याच डोळ्यात खोटे हास्य घेऊन जगाला सामोरं जाणं ... इतकं सोप्प असतं का !? या जीवनाच्या किलबिलित स्वतःला विसरून, सगळ्यांसाठी करत जाणं... इतकं सोप्प असतं का !? आयुष्य एकदाच भेटतं म्हणून कायम आनंदी राहणं... इतकं सोप्प असतं का !? इतकं सोप्प असतं का !?
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
