राजकारण
राजकारण ====================== राज कारण आजच , दिसते तसे नसते, म्हणुनच लोक फसते, आणी सत्तेत टिकण्यासाठी, हे सार कराव लागते. बापाच्या विरोधात मुलाला, उभे राहावे लागते. फुकटचा पैसा मिळवण्यासाठी, असे सोंग काढावे लागते. मतदार बी आज हुशार झाला, बोंबा एकाच्या नावाने, दारु पैसा दुसऱ्याचा, आणि मतदान तिसऱ्याला. आजची परिस्थिती फारच बिकट झाली, लाडकी बहीण, आणि भाऊ, व आईवडील जेष्ठ नागरिक झाले, आणि यामुळे घरातच मत फुटु लागले. राजकारण बाजुलाच राहील, घरातच वातावरण तापल, या राजकारणामुळे, आता काही खर नाही राहील, आता काही खर नाही राहील. ======================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
