ती
पसरलेले पिसारे हे सारे मनाला जरा जिरवत जाई कधी हसरे तर कधी रडवे हे गाणे या क्षणांना झुलवत जाई तरी हे पिसारे ती जुळवत जाई हृदयाचे बंध विणते जाई क्षणांना ही या ती हरवत जाई जीवनाला या बहरवत जाई वाटले होते संपले सारे काही काट्या कुट्या ने हरलो ग मी थांबणार हात तेव्हा तीच होता तिच्यात दडले होते सारे काही मुलगी ताई पत्नी आई नि माई सारे मायेचे हककाचे नी प्रेमाचे रूप जीवनाच्या या रंगमंचावर बघा ती आपले पात्र निभवत जाई तिच्या कलेने मी ही बहरत जातो गुंत्यात ही ती गुंफे जाई जुई जीवन हे फुले जरा कसे हसरे सुगंध तयाचं ती फुलवत जाई
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
