स्त्री
स्त्री म्हणजे आधार स्त्री म्हणजे देवाने दिलेला वरदान नऊ महिने पोटात ठेवून कळ सोसून जन्म तुला मी देते जन्मानंतर मात्र तुझ्या नावापुढे माझे नाव नसते पुरुषांना मात्र आठवड्यातून एकदा तरी सुट्टी असते महिलांना मात्र सुट्टी म्हणजे काय माहित नसते ती कुटुंबासाठी झडते मुलांवर संकट आले की ती अख्ख्या दुनियाशी लढते आजारी असली तरी सर्वांसाठी सर्व करते ती स्वतःला थोडासा आराम हवा आहे विसरते ती बेजबाबदार नाही ती ती त्यागाची मूर्ती आहे आई, बहीण, बायको, म्हणून जगात तिची कीर्ती आहे प्रेम तिच्या मनातले तुम्हाला कळणार नाही तिच्याशिवाय मात्र घराला घरपण येणार नाही सासरची सगळी नाते जपते ती तरीही सासर्यांच्यासाठी परकीच ती ती घरासाठी आपले सर्वस्व प्रणाला लावते आपल्या वेगवेगळ्या अवताराने ती घर मनापासून जपते ती फक्त एक स्त्री असते ती फक्त एक स्त्री असते हे सगळे तुझे उपकार पाहून मनात एक प्रश्न येतो सांग ना ग बाई असं का ग नाही तुझ्या इतकी चांगली कोणच का ग नाही छाया प्रशांत पेडणेकर
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
