आत्ता कळलं प्रेम म्हणजे काय ❤️
ऐक ना,, आज खरंच कळले प्रेम म्हणजे काय एकमेकांच्या श्वासात गुंतणं म्हणजे काय आज अनुभवून बघितलं प्रेम कसं असतं आणि ते दोघातलं रेशीम कसं विणतं. जेव्हा तू पहिल्यांदा माझ्या समोर आलास ना तेव्हाच काहीतरी होत होतं कळत नकळत मन माझं प्रेमाची गाणी गात होतं कठोर मनाच्या मुलीच हृदय हळवं झालं आणि, तीच तिलाच कळलं नाही ते कधी प्रेमात पडलं कधी विचारही केला नव्हता की असं काहीतरी होईल ती सगळं काही बाजूला सारून या वळणाकडे जाईल आज खरंच मी स्वतः ला ओळखलं स्वतः च स्वतः च्या आत डोकावलं कधीही न हरणारी आज प्रेमासमोर हरले मी म्हणूनच विचारते, will you marry me??
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
