"भ्रमित कार्यकर्ता
दर पाच वर्षांनी येतो सन लोकशाहीचा, मोठ्या नेत्यांनी घेतला कळस पाखंडीचा! पाच वर्ष त्यांना कुठेच दिसत नाही वाट, निवडणुकीच्या वेळी मात्र पडे पाया सात-सात! साहेबांनी ठेवला जसा पाठीवर हात, झाला कार्यकर्ता आणि घेतला पक्षात घाट! नेते मोठाले लढतात निवडणुकीच्या रणात, कार्यकर्त्यांचे मात्र भांडण होते वाद-विवादात! काल पर्यंत जे होते मित्र एकसंध, आज वैरी झाले, भिंत बांधली जिथे नातं होतं दंड! वेळ आली तर नेते कधी येत नाही,i पण कार्यकर्ता मात्र रात्रंदिवस गाडीत फिरतो काही! चहा पेक्षा केटली गरम हाच कार्यकर्ता, नेते ऐष करताना, हा झोपतो ओसरीवर पथरा! गुलाल उधळतो, म्हणतो साहेब महान, निवडून आल्यावर मात्र विसरतो ओळख पूर्णतः! निवडणुकीत साहेबाला यश मिळते बाई, पण कार्यकर्ता कार्यकर्ताच राहतो कायमच साई! हीच आहे नेते-कार्यकर्त्यांची कथा, खरे सांगायचे तर ही एक दु:खाची व्यथा! धम्मा गजभिये (श्वेधम्म)
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
