हीरवळ श्रावनाची
हीरवळ श्रावनाची ======================== यंदा श्रावनाची हीरवळ नेहमी पेक्षा बरी आहे, मणाची ऊमंग शेतीचा माल पाहुण, थोडी आशा वाढवणारीच आहे. आमच्या हीची यंदा पायातल्या पैजनाची, आशा पुर्णच होईल, सीवाय छकुलीचे दोन जोडी, परकर पालक्याचे स्वप्न, नक्कीच साकार होईल. य़ंदा पीक चांगलच जोमात दिसत, गेल्या वर्षी पेक्षा माल थोडा तरी नक्कीच, जास्त होईल, आमच्या भैय्यासाहेबाला....., ऍटलसची बासलर बायसीकल, घेण्याच बऱ्याच दिवसापासून ठरलेल, जमुनच जाईल. यंदा दिवाळीला थोड मांयदळच करायच, फराळा बरोबर, डिंक लाडु, आणी शेवपापडी......, !. देवा तुझी बी नजर राहु दे बर, उगीच श्रावनाची हीरवळ, आणी मनातील ऊठणारी ऊम़ग कुठ गाल बोट लागु देऊ नको रे बाबा, कुठे गाल बोट लागु देऊ नको रे बाबा. ========================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
