कारण ते एकतर्फी असतं
त्याच असो किंवा नसो आपलं असतं ऐकटच झुरण , ते ऐकटच हसण आणि ऐकटच रडण पण असतं कारणं ते एकतर्फी प्रेम असतं त्याने समजू अथवा न समजू स्वतः च स्वतःला समजवायचं असतं नसतं प्रेम प्रत्येकाच्या आयुष्यात कारणं ते एकतर्फी प्रेम असतं ऐकटच ते रुसणारही असतं ऐकटच मानणारही असतं त्याला समजवणारं कोणीच नसतं कारणं ते एकतर्फी प्रेम असतं विचाराच्या पसाऱ्यात हरवलेलं असतं भावनांच्या गर्दीत गुरफटलेलं असतं प्रेमाच्या बाबतीत मात्र हरलेलं असतं कारणं ते एकतर्फी प्रेम असतं प्रत्येक वेळी सांगत बसणं योग्य नसतं ते नं सांगता ओळखायचं असतं त्यासाठी त्यालाही मन असावं लागत कारणं ते एकतर्फी प्रेम असतं ऐकटच काळजी करनही असतं पण मन मोकळ ही करायच असतं पण ते त्याच्या समजण्यापलीकडे असतं कारणं ते एकतर्फी प्रेम असतं जे आहे ते मग स्विकरायचं असतं कारण त्याच्या नजरेत ते अर्थहीन असतं ते चांगलंही असतं नं वाईटही असतं कारणं ते एकतर्फी प्रेम असतं
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
